Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले; त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे इस्राएलावर वर्चस्व स्थापले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पुन्हा इस्राएल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली; आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याला इस्राएलावर सबळ केले, कारण इस्राएलांनी जे वाईट ते केले होते हे याप्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 3:12
15 Iomraidhean Croise  

अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता; कारण त्याच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता.


तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.


कुर्‍हाडीने तोडणार्‍यापुढे कुर्‍हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्‍यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्‍यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे.


तू ऐकलेस ना? मी हे फार पूर्वीच केले, अगदी प्राचीन काळी योजले असून आता असे घडवून आणले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी;


अभ्राने देश झाकावा तसा तू माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर चाल करून येशील; हे गोगा, शेवटल्या दिवसांत असे घडेल की मी राष्ट्रांदेखत तुझ्या द्वारे आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन.


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणार्‍या दहिवराप्रमाणे आहे.


येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.”


इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले.


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.


तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत; ते आपला दुराचार व दुराग्रह सोडत नसत.


त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. मवाबाच्या हातांतून एहूद इस्राएलांना सोडवतो


पण त्यांचा देव परमेश्वर ह्याचे त्यांना विस्मरण झाले; तेव्हा त्याने हासोराचा सेनापती सीसरा, पलिष्टी लोक आणि मवाबाचा राजा ह्यांच्या स्वाधीन त्यांना केले आणि ते त्यांच्याशी लढले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan