शास्ते 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
10 त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले.
10 त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले,
10 याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला.
मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.
मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणार्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.
त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणार्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या सत्तर वडिलांवर ठेवला; तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले; पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
मोशे त्याला म्हणाला, “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!”
मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला आणि इफ्ताह गिलाद व मनश्शे ह्या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पे येथे आला आणि गिलादी मिस्पे येथून कूच करून अम्मोनी लोकांवर चालून गेला.
मग परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि तो अष्कलोनाला गेला. तेथली तीस माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले; आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला.
तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला, आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही.
तो लेहीपर्यंत येऊन पोहचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली.
म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले.
मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.