Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती की, “आपल्यांपैकी कोणीही बन्यामिन्यांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता इस्राएली मनुष्यांनी मिस्पात अशी शपथ वाहिली होती की, “आमच्यातला कोणीही आपल्या मुली बन्यामिनाला लग्नासाठी देणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएलांच्या पुरुषांनी मिस्पाह येथे प्रतिज्ञा केलेली होती: “आपल्यापैकी कोणीही आपल्या कन्यांना बिन्यामीन गोत्रांना विवाहात देणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 21:1
19 Iomraidhean Croise  

मग दानापासून बैर-शेबापर्यंतचे सर्व इस्राएल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली.


तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”


मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही.”


बोलण्याची घाई करू नकोस; देवासमोर कोणताही उद्‍गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नकोस; कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे.


त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्राएल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे की, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल.”


तेव्हा सर्व लोक एकमताने उठले व एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही तंबूत जाणार नाही; आपल्यातल्या कोणीही परतायचे नाही.


मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


त्या दिवशी इस्राएल लोक अतिशय दुःखी झाले; कारण शौलाने लोकांना शपथ घातली होती की, “मला आपल्या शत्रूंचा सूड घ्यायचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नाला स्पर्श करील त्याला शाप लागो;” म्हणून त्याच्या लोकांपैकी कोणीही अन्नाला शिवला नाही.


आपण तर परमेश्वराची शपथ वाहिली आहे, आपल्यापैकी कोणीही त्यांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत, तेव्हा त्यांतले जे उरले आहेत त्या प्रत्येकाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे बरे?”


मग इस्राएल लोक विचारपूस करू लागले, इस्राएलाच्या कोणत्याही वंशांपैकी परमेश्वरासमोर भरलेल्या मेळाव्याला आले नव्हते असे कोणी आहेत काय? कारण त्यांनी गंभीर प्रतिज्ञा केली होती, की, “जे मिस्पा येथे परमेश्वरासमोर येणार नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”


मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषांमागे दहा, हजारामागे शंभर, आणि दहा हजारांमागे एक हजार असे पुरुष निवडू; ते सैन्यासाठी भोजनसामग्री आणतील व आपण बन्यामिनाचे गिबा येथे जाऊन तेथील लोकांनी इस्राएलामध्ये जे निर्लज्ज कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करू.”


मग इस्राएल लोकांनी बन्यामिन्यांवर उलटून हाती लागलेली माणसे व जनावरे ह्यांचा संहार केला. तसेच जी गावे त्यांना आढळली ती सर्व आग लावून त्यांनी बेचिराख केली.


त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गार्‍हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हांला ठेवून घेऊ द्या; कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हांला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हांला दोष लागत नाही.”


तेव्हा यिर्मया निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan