Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वराचा दूत सगळ्या इस्राएल लोकांना हे म्हणाला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जेव्हा याहवेहचा दूत या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, ते लोक मोठ्याने रडू लागले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 2:4
13 Iomraidhean Croise  

एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.


वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.


ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.


“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”


आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.


अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल.


आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.


कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.


कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.


म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; ते तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हांला पाश होतील.”


त्यांनी त्या स्थळाचे नाव बोखीम (आक्रोश करणारे) असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले.


मग जासुदांनी शौलाच्या गिब्यास जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानांवर घातले; ते ऐकून सर्व लोक गळा काढून रडू लागले.


तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, “आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे.” तेव्हा शमुवेल मिस्पात इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan