Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हांला म्हणालो होतो; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुम्ही या देशात राहणाऱ्यांशी काही करार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला सांगितले होते, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि तुम्ही या देशातील लोकांशी कोणतेही करार करू नका, परंतु तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका.’ तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही हे का केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 2:2
29 Iomraidhean Croise  

तेव्हा फारोने अब्रामाला बोलावून म्हटले, “तू मला हे काय केलेस? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितलेस?


तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.


तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”


मिसर देशाच्या वाटेस लागून नील नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन? अश्शूर देशाच्या वाटेस लागून फरात नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन?


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


परमेश्वर म्हणतो की, “तुमच्या पूर्वजांना माझ्या ठायी असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले?


जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.


इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.”


कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?


तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही.


आणि मी तुम्हांला म्हणालो की, मीच तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोर्‍यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिऊ नका; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही.”


तेव्हा परमेश्वराने इस्राएल लोकांकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हांला बाहेर आणले;


गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्राएल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले; ते गिदोन व त्याचे घराणे ह्यांना पाश असे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan