Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 नंतर तिची समजूत घालून तिला परत आणावे म्हणून तिचा नवरा, एक नोकर व दोन गाढवे बरोबर घेऊन तिच्या शोधासाठी निघाला. तिने त्याला बापाच्या घरात आणले; त्या मुलीच्या बापाने त्याला पाहिले तेव्हा त्याच्या भेटीने त्याला आनंद झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा तिचा पती उठून तिचे मन वळवून तिला माघारी आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती, तेव्हा तिने त्यास आपल्या वडिलाच्या घरात नेले, आणि त्या मुलीच्या वडिलाने त्यास पाहिले, त्यास भेटून तो आनंदित झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तिचा पती तिला परत आणावे म्हणून तिच्याकडे गेला. त्याच्याबरोबर त्याने एक सेवक आणि दोन गाढवे घेतली. तिने त्याला पित्याच्या घरी नेले आणि जेव्हा तिच्या पित्याने त्याला पाहिले, तेव्हा त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 19:3
16 Iomraidhean Croise  

याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले.


तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.


परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसर्‍याची झाली तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला तरी तू माझ्याकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो.


ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस.


आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नकोस; आपल्या शेजार्‍याची अवश्य कानउघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल.


जो दुसर्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे.


पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला आडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते.


तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.


ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.]


बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.


काही दिवसांनी गहू कापण्याच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या बायकोला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी आतल्या खोलीत आपल्या बायकोकडे जातो;” पण त्याच्या सासर्‍याने त्याला आत जाऊ दिले नाही.


एकदा रागाच्या भरात ती त्याला सोडून यहूदातील बेथलेहेम यहूदा येथे आपल्या बापाच्या घरी गेली व तेथे चार महिने राहिली.


पहाटेस ती स्त्री आपला नवरा ज्या घरी होता तेथे येऊन उजाडेपर्यंत दाराशी पडून राहिली.


त्याच्या सासर्‍याने म्हणजे मुलीच्या बापाने त्याला राहण्याचा आग्रह केल्यामुळे तो त्याच्याकडे तीन दिवस राहिला; ह्याप्रमाणे खाऊनपिऊन त्यांनी तेथे मुक्काम केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan