शास्ते 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जा-करांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले. ‘सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू’ असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 गज्जेकरास सांगण्यात आले की, “शमशोन तिथे आला आहे.” गज्जकरांना ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळ उजडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्यास जिवे मारू. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 गाझा येथील लोकांना सांगण्यात आले, “शमशोन येथे आला आहे!” म्हणून त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि त्याची वाट पाहत शहराच्या वेशीत रात्रभर दबा धरून बसले. त्यांनी रात्रभर कोणतीही हालचाल केली नाही, ते म्हणाले, “पहाटेस आपण त्याला ठार मारू.” Faic an caibideil |