Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, “पाहा, तू वांझ असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, “पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेहच्या दूताने तिला दर्शन दिले आणि म्हणाला, “तू वांझ आहे आणि तुला मूल नाही, तरीपण तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 13:3
16 Iomraidhean Croise  

मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन; मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील; तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.”


मग तो म्हणाला, “पुढल्या वसंत ऋतूत (जीवनाच्या वेळेस) मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन; तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.” त्याच्यामागे डेर्‍याच्या दारी सारा हे ऐकत होती.


परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”


तो तिला म्हणाला, “वसंतऋतु पुनरपि येईल तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील.” ती म्हणाली, “छे, छे, माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीशी खोटे बोलू नका.”


तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला.


देवदूताने त्याला म्हटले, “जखर्‍या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव.


म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन त्याला सांगितले, “त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे.”


मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “आम्ही आपणासाठी एक करडू कापतो तेव्हा आपण अंमळ थांबावे अशी आमची विनंती आहे.”


त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवर्‍याला सांगितले, “एक देवमाणूस माझ्याकडे आला, त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते; पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही व त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही.


हे ऐकून मानोहाने परमेश्वराची विनवणी केली, “हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठवला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणार्‍या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हांला शिकवावे असे कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे.”


परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;


तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, “तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडव; मी तुला पाठवले आहे ना?”


ह्या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला; “हा परमेश्वराकडे मागितला” असे म्हणून तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan