Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग एफ्राइमी लोक जमा होऊन साफोन येथे गेले. ते इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तुझ्याबरोबर येण्यासाठी आम्हांला का नाही बोलावलेस? आम्ही तुझ्या घरासकट तुला जाळून टाकतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 सर्व एफ्राइमी लोक एकत्र झाले आणि यार्देन नदी पार करून उत्तरेस साफोन नगरात जाऊन इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेलास, तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग एफ्राईमच्या लोकांनी आपले सैन्य एकवटली आणि ते पार होऊन साफोन येथे आले. ते इफ्ताहाला म्हणाले, “आम्हाला सोबत न घेता तू अम्मोन्यांशी लढावयास का गेलास? आता आम्ही तुझ्यासह तुझे घर जाळून टाकणार आहोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 12:1
14 Iomraidhean Croise  

मी प्रेमाने वागत असता ते मला विरोध करतात; मी तर प्रार्थनेत मग्न असतो.


मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.


आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.


येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?”


कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.


ह्यावरून इस्राएल लोकांत अशी चाल पडली की, इस्राएल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात जावे.


इफ्ताह त्यांना म्हणाला, “माझ्या व माझ्या लोकांच्या अम्मोनी लोकांशी चकमकी झडत असताना मी तुमची कुमक मागितली होती तेव्हा तुम्ही त्यांच्या हातून मला सोडवले नाही.


चवथ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, “तू आपल्या नवर्‍याला फूस लावून त्याला ह्या कोड्याचा अर्थ सांगायला लाव, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या घराला जाळून टाकू. तुम्ही आम्हांला लुबाडायला येथे बोलावले आहे, असेच ना?”


पलिष्टी विचारू लागले, “हे कोणी केले?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “तिम्नाकराचा जावई शमशोन ह्याने; कारण त्याच्या सासर्‍याने त्याची बायको काढून त्याच्या सोबत्याला दिली आहे.” मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या बापाला जाळून टाकले.


तेव्हा एफ्राइमी पुरुष त्याला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागलास? तू मिद्यानाशी लढायला निघालास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” अशी ते त्याच्याशी हुज्जत घालू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan