Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याला तीस मुलगे होते, ते तीस गाढवांवर स्वारी करत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यास तीस पुत्र होते; प्रत्येकाचे आपापले गाढव होते ज्यावर ते सवार होत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 10:4
8 Iomraidhean Croise  

राजाने सिबाला विचारले, “ह्याचे प्रयोजन काय?” सीबा म्हणाला, “गाढव हे राजघराण्यातल्या लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरांना खाण्यासाठी, आणि द्राक्षारस रानात थकल्या-भागलेल्यांना पिण्यासाठी आहे.”


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


आणि मनश्शेचा वंशज याईर ह्याने अमोर्‍यांची खेडी काबीज केली आणि त्यांना हव्वोथ-याईर (याइराची खेडी) हे नाव दिले.


मनश्शेचा मुलगा याईर ह्याने गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला आणि बाशानाला आपले नाव म्हणजे हव्वोथ-याईर असे ठेवले, तेच आजवर चालत आहे.)


त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.


याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. अम्मोन्यांच्या हातून इस्राएल लोकांचा छळ


त्याला चाळीस मुलगे व तीस नातू होते. ते सत्तर गाढवांवर स्वार होत. त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.


शुभ्र गर्दभांवर स्वारी करणार्‍यांनो, अमूल्य गालिच्यांवर बसणार्‍यांनो, वाटेने चालणार्‍यांनो, ह्याचे गुणगान करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan