Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मोशेचा सासरा2 केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले; हे रान अरादाजवळील नेगेबात आहे; तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मोशेचा मेहुणा जो केनी त्यांचे वंशज यहूदाच्या लोकांबरोबर खजुरीच्या नगराहून अरादाजवळील यहूदातले (जे नेगेबात आहे) रान आहे तेथे चढून गेले; आणि तेथे जाऊन यहूदा लोक अराद जवळ त्या लोकांबरोबर राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मोशेच्या सासर्‍याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 1:16
26 Iomraidhean Croise  

सहावा ओसेम व सातवा दावीद हे पुत्र झाले;


आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी; ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथ ह्याच्या वंशातली केनी कुळे होत.


त्या वेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली.


देवाने मोशे व आपली प्रजा इस्राएल ह्यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून कसे बाहेर आणले हे मोशेचा सासरा मिद्यानाचा याजक इथ्रो ह्याने ऐकले.


मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पण केले व यज्ञ केले; आणि अहरोन इस्राएलांच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करायला आला.


मग मोशेने आपल्या सासर्‍याला निरोप दिला आणि तो आपल्या देशाला निघून गेला.


तेव्हा मोशे आपल्या सासर्‍यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले; त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेर्‍यात गेले.


मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.


मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.”


“रेखाब्यांच्या घराण्याकडे जा, त्यांच्याबरोबर भाषण कर, आणि परमेश्वराच्या मंदिरात, त्यातल्या एका कोठडीत आणून त्यांना द्राक्षारस प्यायला दे.”


अथारीमच्या वाटेने इस्राएल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणार्‍या अरादाच्या कनानी राजाने ऐकले, तेव्हा त्याने इस्राएलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले.


त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की,


आणि नेगेब व सोअरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर यरीहो ह्याचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला दाखवले.


परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या देशाविषयी मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की, तो मी तुझ्या संतानांना देईन, तो देश हाच; तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जायचे नाही.”


हर्माचा राजा, अरादाचा राजा,


बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या कुळां-प्रमाणे ही नगरे मिळाली : यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केसीस,


ती त्याला म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या.” तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले.


तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्राएलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले.


मोशेचा सासरा1 होबाब ह्याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता.


सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते.


शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हायचा; कारण इस्राएल लोक मिसरातून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहभावाने वर्तला.” ह्यावरून केनी अमालेक्यांतून निघून गेले.


आखिशाने विचारले, “आज तू कोणावर स्वारी केलीस?” दावीद म्हणाला, “यहूदाचा दक्षिण प्रांत, यरहमेल्यांचा दक्षिण प्रांत व केन्यांचा दक्षिण प्रांत ह्यांवर.”


राखाल व यरहमेली येथले नगरवासी, केन्यांच्या नगरातले रहिवासी,


Lean sinn:

Sanasan


Sanasan