Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला, कत्तलीच्या दिवसासाठी तुम्ही स्वतःला धष्टपुष्ट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पृथ्वीवर तुम्ही विलासात आणि भोगासक्तीत राहिला. तुम्ही स्वतःला वधासाठी धष्टपुष्ट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 5:5
28 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;


मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात.


एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा.


“मला शांत्यर्पणे करायची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले.


हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.


पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.


परमेश्वर असेही म्हणतो : सीयोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात, आपल्या पायांतील नूपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात;


अगे विलासिनी, जी तू निश्‍चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक :


ते म्हणतात, “चला, या, मी द्राक्षारस घेऊन येतो; आपण मद्याने मस्त होऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो अतिशय चैनीचा होईल.”


तथापि हे परमेश्वरा, तू मला जाणतोस, मला पाहतोस, तुझ्याविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखतोस; वधायला न्यायच्या मेंढरांसारखे त्यांना बाहेर काढ; वधाच्या दिवसासाठी त्यांना सिद्ध कर.


मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.


पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत ह्यांना तिने हात दिला नाही.


प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मानवपुत्रा, हरतर्‍हेच्या पक्ष्यांना व वनपशूंना सांग की जमा व्हा; या, मी तुमच्यासाठी यज्ञबली कापत आहे, इस्राएलाच्या पर्वतांवर महायज्ञ करत आहे; तेथे चोहोंकडून एकत्र होऊन मांस खा, रक्त प्या.


“सीयोनेत सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्‍चिंत असणारे ह्यांना धिक्कार असो! प्रधान राष्ट्रांतल्या ज्या प्रमुखांकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्याला धिक्कार असो!


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.


अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.


दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.


परंतु जी विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे.


विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,


अनीतीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो; दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत; तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते.


ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक1 असे आहेत; ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत;


ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’


मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही.


त्या सुखसंपन्न पुरुषाला म्हणा की, ‘आपले आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan