Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 5:15
18 Iomraidhean Croise  

“मी रोगी आहे” असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.


तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हांला खचीत सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.


त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”


आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे.


कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्‍या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले.


हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील.


पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वार्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.


तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.


तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.


तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून3 वाचवील व ‘पापांची’ रास ‘झाकील’, हे ध्यानात ठेवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan