Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुम्हापैकी कोणी त्रासात आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 5:13
34 Iomraidhean Croise  

त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.


तो देवाची प्रार्थना करतो, आणि तो त्याच्यावर प्रसन्न होतो; तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो; देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करतो.


त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.


अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले.


मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.


पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्नहृदयी होऊन आकांत कराल.


त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.


माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली.


सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव ह्याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.


नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले.


मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.


मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”


तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार.


बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो; सर्वकाही उन्नतीसाठी असावे.


स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा;


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या.


ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.


ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan