Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांनी दुःखसहन केले म्हणून आपण त्यांना धन्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोसुध्दा पाहिला आहे, तो असा की प्रभू फार दयाळू आणि कनवाळू आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही ईयोबच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता, तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्हांला दिसून आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही इय्योबाच्या धीराविषयी ऐकले आणि शेवटी प्रभूने त्याला कसे आशीर्वादित केले हे तुम्ही पाहिले. प्रभू करुणा आणि दया यांनी भरलेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 5:11
53 Iomraidhean Croise  

दावीद गादाला म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; आता परमेश्वराच्या हातात मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.”


तुम्ही आता परमेश्वराकडे वळला तर ज्यांनी तुमचे भाऊबंद व तुमची मुले पाडाव करून नेली आहेत ते त्यांच्यावर दया करतील व ती ह्या देशास परत येतील, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे वळला तर तो आपले मुख तुमच्याकडून फिरवणार नाही.”


त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्‍चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.


तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाहीस, त्यांचा त्याग केला नाहीस, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस.


ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही.


त्याला सात पुत्र व तीन कन्या झाल्या.


तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.


परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे; त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन.


जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्‍यांवर ममता करतो.


परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.


परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.


तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्‍यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर.


परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.


सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.


हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.


पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.


तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.


हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.


हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य;


परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,


एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा.


परमेश्वराने आमच्यावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुसरून असे परमेश्वराच्या सदय कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन.


त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.


आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.


आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.


तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.


‘परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे; तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.’


आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.


जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे.


तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे,


परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.


कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.


ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत.


जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.


माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.


म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.


परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दु:ख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका’,


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan