Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले, त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा आदर्श ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 बंधूंनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 5:10
19 Iomraidhean Croise  

पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.


तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या काळात तरी शांतता व स्थिरता राहील.”


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


पण ते माझ्या मंत्रिमंडळात असते तर त्यांनी माझी वचने माझ्या लोकांना विदित केली असती आणि त्यांना त्यांच्या दुष्ट मार्गांतून व त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.


तेव्हा सरदार व सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही; कारण परमेश्वर आमचा देव ह्याच्या नामाने तो आमच्याबरोबर बोलला आहे.”


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.


सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.


ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.


जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.


बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो; आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस.


तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.


अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.


बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका; पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan