Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्यांविषयी रडून आकांत करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 अहो धनवानांनो, माझे ऐका! जे क्लेश तुम्हांला होणार आहेत, त्याविषयी रडून आकांत करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 5:1
36 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;


जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील.


क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते.


आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.


आपल्या पेठांत ते गोणपाट नेसून आहेत; आपल्या धाब्यांवर व चौकांत ते सगळे आकांत करत आहेत, अश्रू ढाळत आहेत.


म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”


परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये;


आणि असे म्हण, ‘तुझी आई कोण? ती सिंहीण होती, ती सिंहांमध्ये वसत होती; तिने तरुण सिंहामध्ये आपल्या पेट्यांचे संगोपन केले.


“मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जळो तो दिवस, असा हाहाकार करा.


शेतकर्‍यांनो, निराश व्हा; द्राक्षीचे मळे करणार्‍यांनो, गहू व जवस ह्यांकरता विलाप करा, कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे.


याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा; द्राक्षारस पिणार्‍यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे.


तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात; त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे;


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले,’ आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.


पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही?


अहो! जे तुम्ही म्हणता की, “आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,”


कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan