Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हांला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही; तुम्ही भांडता व लढता; तुम्ही मागत नाही, म्हणून तुम्हांला प्राप्त होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुम्ही लोभ धरता पण तुम्हास मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हास मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तुम्ही इच्छा धरता, तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्ही घात करायला तयार होता. हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही म्हणून तुम्ही भांडणतंटे करता. तुम्ही देवाकडे मागत नाही, म्हणून तुम्हांला मिळत नाही

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुम्ही इच्छा करता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही वध करता. तुम्ही लोभ धरता, परंतु जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही भांडता आणि लढता. तुमच्याकडे नाही कारण तुम्ही परमेश्वराकडे मागत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 4:2
14 Iomraidhean Croise  

तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’


धनाचा लोभ धरणार्‍या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


आहाज म्हणाला, “मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”


शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे; तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे. तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रांना आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांना आपल्यानजीक एकत्र करतो.”


तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.


येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”


जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो;


नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला; तो तुम्हांला विरोध करत नाही.


जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan