Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 3:9
34 Iomraidhean Croise  

आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;


जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.


दावीद राजा बहूरीम येथे पोहचला तेव्हा पाहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला; त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते; तो शिव्याशाप देत आला.


सरूवेचा पुत्र अबीशय म्हणाला, “शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय?”


दाविदाने सर्व मंडळीदेखत परमेश्वराचा धन्यवाद केला; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल ह्याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस.


मग दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करा.” तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लववून परमेश्वराला व राजाला वंदन केले.


त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत.


हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी गाईन, मी जिवेभावे स्तोत्र गाईन.


हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.


माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील; सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत.


म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्लासतो; माझा देहही सुरक्षित राहतो.


ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये; हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन.


परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.


माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.


हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.


हे माझ्या जिवा, जागृत हो, हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा; मी प्रभातेला जागे करीन.


त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखांतील शब्द, त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या ह्यांमुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत.


त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात; त्यांना लबाडी आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. (सेला)


मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन; तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन.


माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.


कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे.


प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.


तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला.


मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा.


म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील.


“त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे.”


पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.


त्यांनी शेतात जाऊन द्राक्षमळ्यातील द्राक्षे खुडून व तुडवून त्यांचा रस काढला आणि उत्सव केला. आपल्या देवाच्या मंदिरात जाऊन मेजवानी केली व अबीमलेखाला शिव्याशाप दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan