Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 म्हणून ‘तू जशी स्वत:वर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर’, हा धर्मशास्त्रातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत असाल तर ते बरे करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 2:8
23 Iomraidhean Croise  

पण परमेश्वराने माझा बाप दावीद ह्याला सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहेस हे तू चांगले केले आहेस;


मग ते आपसांत म्हणू लागले, “आपण करत आहोत ते बरे नाही; आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल; तर चला, आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू.”


सूड उगवू नकोस किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नकोस, तर तू आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर; मी परमेश्वर आहे.


तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वत:सारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?”


तेव्हा देव योनाला म्हणाला, “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.”


हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर.’


त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’


त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’


ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्टग्रंथ ह्यांचे सार हेच आहे.


प्रीती शेजार्‍याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.


कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे.


एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.


तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत.


बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे ह्याची तुम्हांला गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हांला देवानेच शिकवले आहे;


परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.


स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा.


एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.


बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो; आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस.


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan