Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वार्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 मात्र मागणाऱ्याने काही शंका न धरता विश्वासाने मागावे कारण शंका धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंचबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्‍याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्‍या समुद्राच्या लाटेसारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 1:6
14 Iomraidhean Croise  

तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही; कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केलीस. तो माझ्या शय्येवर चढला.


तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.”


तर ऊठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मीच त्यांना पाठवले आहे.”


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.


आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे;


आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.


विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.


असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.


विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल.


ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धुके, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी सर्वकाल राखलेली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan