Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 1:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत कैवार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, हे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 1:27
36 Iomraidhean Croise  

जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!


परमेश्वर उपर्‍यांचे रक्षण करतो; अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो; परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो.


पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्‍या युगातही नाही.


‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.


नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे; कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”


ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे.


त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.


आणि लेव्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल.


ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी.


कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्‍या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.


धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे.


वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.


तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो.


अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.


त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले, तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे.


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,


जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे; जो देवापासून जन्मला तो (ख्रिस्त) त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan