Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9-10 “विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिर्‍यांचे बांधकाम करू, उंबरांची झाडे तोडून टाकली आहेत तर त्यांच्या जागी गंधसरू लावू.” असे गर्वाने व उद्दामपणाने म्हणणार्‍या सर्व लोकांना म्हणजे एफ्राइमास व शोमरोनच्या रहिवाशांना हे कळून येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:9
23 Iomraidhean Croise  

मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”


गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


एफ्राइमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार.


एफ्राइमातील मद्यप्यांचा दिमाखखोर मुकुट पायांखाली तुडवतील.


नीतिमत्तेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका.


तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते.


‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्‍याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली.


प्रभूने याकोबाला संदेश पाठवला असून तो इस्राएलाच्या ठायी प्रविष्ट झाला आहे.


पाहा, हे नगर घेण्यासाठी त्याला वेढा घालणार्‍यांचे मोर्चे लागले आहेत; तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे ह्यांच्याशी युद्ध करणार्‍या खास्द्यांच्या हाती हे लागले आहे; तू बोललास तसे घडले आहे. पाहा, हे तुला दिसत आहे.


ह्या प्रकारे मी मिसरास न्यायदंड करीन; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”


तरीपण हे घडून येईल, (पाहा, ते आता घडत आहे,) तेव्हा आपल्यात एक संदेष्टा होता, असे त्यांना समजून येईल.”


राजा शोक करील, सरदार दरार्‍याने व्याप्त होईल, देशातील लोकांचे हात थरथरतील. मी त्यांच्या आचाराप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करीन, त्यांच्या गुणदोषांप्रमाणे त्यांचा न्याय करीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही; मी तुझी गय करणार नाही; तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन, तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारत आहे.


कारण इस्राएलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधली आहेत; पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील.


अदोम म्हणाला, “आमची नासधूस झाली, तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू;” तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “ते बांधतील, पण मी पाडून टाकीन; आणि लोक त्यांना दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्याच्यावर सदा रुष्ट आहे, असे राष्ट्र म्हणतील.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे; तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो?’


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan