Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:7
34 Iomraidhean Croise  

तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.”


कारण यरुशलेमेतून शेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल.


माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;


इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;


वात्सल्याचे सिंहासन स्थापले आहे; त्यावर दाविदाच्या डेर्‍यात कोणीएक सत्यनिष्ठ विराजमान होईल; तो न्याय करणारा, न्यायप्रिय, नीतिमत्तेत निपुण असा असेल.”


तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील; सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


पाहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हाती आहे.


परमेश्वर वीराप्रमाणे निघेल; रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूंना आपला प्रभाव दाखवील.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.


तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वार्‍याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूस राहिला नाही; त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.


राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन ह्यांना देण्यात येतील; त्याचे राज्य सनातन आहे, सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील.”


ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”


पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, “हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे; आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.


पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे.


‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan