Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:4
24 Iomraidhean Croise  

तू आपल्या तलवारीने जगशील, व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या मानेवरचे त्याचे जू उडवून देशील.”


नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत, म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही.


“मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.


जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो.


मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायांखाली तुडवीन; तेव्हा त्याचे जूं त्यांच्यावरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल.”


माझ्या घालवून दिलेल्यांना तुझ्याजवळ राहू दे; मवाबाला लुटारूंपासून आसरा हो; कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे; नासधूस बंद झाली आहे; पायमल्ली करणारे देशातून नाहीतसे झाले आहेत.


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


तुझा छळ करणार्‍यांना स्वतःचेच मांस खायला लावीन; नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील; ह्यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे सर्व मानवजातीला समजेल.”


आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस? जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे म्हणून त्याच्या क्रोधास सारा दिवस एकसारखी का भितेस? जुलम्याचा क्रोध उरला आहे कोठे?


अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक.


नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही; तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्याजवळ येणार नाही;


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्यांचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन, ह्यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करवून घेणार नाहीत;


त्याच्या आसपास असणारे व त्याचे नाव जाणणारे तुम्ही सर्व त्याच्यासाठी शोक करा; म्हणा, ‘मजबूत वेत्र, वैभवी दंड कसा मोडला आहे!’


मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्‍यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे.


आता मी तुझ्यावरील त्याचे जूं मोडीन, तुझी बंधने तोडून टाकीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan