Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत. प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील परंतु ते भुकेले राहतील; डाव्या बाजूला असलेलेही खातील परंतु समाधानी होणार नाहीत. प्रत्येकजण स्वतःच्याच संततीचे मांस खातील:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:20
16 Iomraidhean Croise  

मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो.1


बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील.


पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, हा यरुशलेम व यहूदा ह्यांचा आधार व टेका काढून घेतो, म्हणजे भाकरीचा सर्व आधार व पाण्याचा सर्व आधार काढून घेतो;


तुझा छळ करणार्‍यांना स्वतःचेच मांस खायला लावीन; नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील; ह्यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे सर्व मानवजातीला समजेल.”


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या : उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?


ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील; आणि असे होईल की त्यांना भूक लागली म्हणजे ते संतापून आपल्या राजाला व आपल्या देवाला शिव्याशाप देतील; मग आपली तोंडे ते वर करतील;


ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील.


त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


मी त्यांना त्यांच्या पुत्रांचे मांस व त्यांच्या कन्यांचे मांस खायला लावीन; त्यांचे शत्रू व त्यांचा जीव घेण्यास टपणारे त्यांना वेढा घालतील व पेचात आणतील, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या शेजार्‍याचे मांस खाईल.’


कोमलहृदयी स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजवली; ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी त्यांचे खाद्य झाली.


तू खाशील, पण तृप्त होणार नाहीस; तुझ्या ठायी कंगालपणा राहील; तू धनाची सारासार करशील, पण ते तुला वाचवता येणार नाही व तू काही वाचवलेस तर मी ते तलवारीच्या हवाली करीन.


मग मी म्हणालो, “मी ह्यापुढे तुम्हांला चारणार नाही; कोणी मेले तर मरू द्या, कोणी नष्ट झाले तर नष्ट होऊ द्या; वाचून राहिलेल्यांना एकमेकांचे मांस खाऊ द्या.”


आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan