Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही, कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते. या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 म्हणूनच प्रभू त्यांच्या तरुण पुरुषांना पाहून प्रसन्न होणार नाहीत; त्यांना विधवांचा आणि अनाथांचा कळवळा येणार नाही; कारण हे सर्वच अधर्मी व दुष्ट असून, प्रत्येक मुख असत्य बोलणारे आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:17
33 Iomraidhean Croise  

देवहीनांचा परिवार फलहीन होईल; लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी भक्षील.


त्याच्यावर कोणीही दया न करो; त्याच्या अनाथ मुलांची कीव कोणालाही न येवो.


तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


ते दाद मागणार्‍या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात.


बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


त्यांची धनुष्ये तरुणांना पाडतील; ते पोटच्या फळावर दया करणार नाहीत; त्यांचे नेत्र मुलांची कीव करणार नाहीत.


त्यांच्याबरोबर तुला मूठमाती मिळणार नाही, कारण तू आपल्या देशाची नासधूस केली व आपल्या प्रजेचा वध केला; कुकर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही.


पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


यरुशलेम कोसळली आहे, यहूदा पतन पावला आहे; कारण त्यांची जिव्हा व त्यांची कृत्ये परमेश्वराविरुद्ध असून ते त्याच्या तेजोमय नेत्रांना तुच्छ लेखतात.


तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.


मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.


तुम्ही भुसाचा गर्भ धराल व धसकट प्रसवाल; तुमचा श्वास हाच अग्नी आहे, तो तुम्हांला ग्राशील.


राष्ट्रे भाजलेल्या चुनखडीसारखी भस्म होतील; काटेरी झुडपे तोडून आगीत जाळतात तशी ती होतील.”


तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात;


ह्यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल; त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल; कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे नियमशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे वचन अव्हेरले आहे.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.


मी यरुशलेमेविषयी उल्लास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन, तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही.


पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.


यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुमच्यावर राज्य करीन.


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


त्या समयी सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्च्छित होतील.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


त्यांची आबादानी केवढी! त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणांना आणि नवा द्राक्षारस तरुणींना धष्टपुष्ट करील.


अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.


आणि तुम्ही सकाळी म्हणता, ‘आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ अहो ढोंग्यानो, तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळांची लक्षणे तुम्हांला ओळखता येत नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan