Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची झावळी व लव्हाळा ही एका दिवसात छेदून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणून याहवेह एकाच दिवसात इस्राएलचे मस्तक आणि शेपूट, खजूराच्या फांद्या आणि लव्हाळा हे दोन्ही कापून टाकतील;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:14
28 Iomraidhean Croise  

इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, त्याचा जो पवित्र प्रभू तो ज्वाला होईल; एका दिवसात त्याचे काटेकुटे व काटेझुडपे तो जाळून खाक करील.


तेव्हा शीर अथवा शेपूट, झावळी किंवा लव्हाळा ह्यांना करता येईल असे एकही कार्य मिसर देशात उरणार नाही.


म्हणून एकाएकी कोसळून पडणार्‍या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल;


ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वराच्या मुखाने त्यांना विखरले आहे; तो आता त्यांच्याकडे पाहत नाही; ते याजकाचा मान राखत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत.


तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन.


ह्यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “हिचे नाव लो-रुहामा (दया न पावलेली) ठेव; कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्यांच्यावर पुन्हा करणार नाही.


तेव्हा परमेश्वर म्हणाला, “ह्याचे नाव लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ठेव; कारण तुम्ही माझे लोक नव्हत व मी तुमचा नव्हे.”


तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हांला असे होईल; प्रभातकाळी इस्राएलाचा राजा नाश पावेल.


ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे होतील, खळ्यातून वावटळीने उडणार्‍या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे ते होतील.


तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन.


इस्राएलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत.


परमेश्वर म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपर्‍यात रेशमी गादीवर बसणारे इस्राएलाचे वंशज आपला जीव वाचवतील.”


कारण पाहा, परमेश्वर आज्ञा करील तेव्हा मोठ्या घरांना भगदाडे पाडण्यात येतील आणि लहान घरांना भेगा पाडण्यात येतील.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”


एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.” सर्व ‘तांडेल’ गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर ‘उभे राहिले,’


ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan