Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी इस्राएलला मोठा आ वासून गिळंकृत केले आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:12
25 Iomraidhean Croise  

त्या वेळी अरामाचा राजा रसीन ह्याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा अरामात सामील केले व तेथल्या यहूदी लोकांना हाकून दिले; अरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत.


आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले.


कारण त्यांनी याकोब वंशाला गिळून टाकले आहे, व त्यांची वस्ती ओसाड केली आहे.


बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबाला ग्रासून टाकले आहे, त्याला खाऊन टाकले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.


मी त्यांना आपल्या देशाच्या वेशींवर सुपाने पाखडून टाकले, त्यांना अपत्यहीन केले; मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत.


बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्या देशावर चालून आला तेव्हा मात्र आम्ही म्हटले, ‘खास्द्यांचे सैन्य व अराम्यांचे सैन्य ह्यांच्या भीतीस्तव चला, आपण यरुशलेमेस जाऊ.’ म्हणून आज आम्ही यरुशलेमेत राहत आहोत.”


म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”


तेव्हा पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझे नित्याचे अन्न कमी केले आणि ज्यांना तुझे शिंदळकीचे वर्तन लज्जास्पद वाटते त्या तुझा द्वेष करणार्‍या पलिष्ट्यांच्या कन्यांच्या स्वाधीन तुला केले.


मी आपला हात त्यांच्यावर उगारीन आणि त्यांच्या सर्व वसतिस्थानांतील भूमी दिबलाकडच्या रानापेक्षा वैराण व ओसाड करीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो; इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव ह्याच्याकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत.


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


“देवाने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला तसा तुमच्यातल्या काही जणांचा नाश केला आहे; तुम्ही अग्नीतून काढलेल्या कोलितासारखे झालात; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


“मी तर तुम्हांला तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली, व तुमच्या सर्व स्थानांत भाकरीची वाण पाडली, तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


दोन-तीन गावे पाणी पिण्यासाठी एका गावात पडत-झडत गेली, त्यांची तृप्ती झाली नाही; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


“तांबेरा व भेरड ह्यांच्या योगे मी तुमचे ताडन केले; तुमच्या बागा, तुमचे द्राक्षीचे मळे, तुमची अंजिराची झाडे व तुमची जैतून झाडे, कुरतडणार्‍या टोळांनी खाऊन टाकली; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.”


तिने वचन मानले नाही, बोध घेतला नाही; परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही.


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan