Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे इम्मानुएला! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल, तिच्यामधून जाईल आणि तिच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. त्याचे पसरलेले पंख तुमच्या देशाचा विस्तार झाकून टाकतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 8:8
22 Iomraidhean Croise  

अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली.


यहूदाची तटबंदी नगरे घेत घेत तो यरुशलेमेपर्यंत आला.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


त्याचा श्वास दुथडी भरून वाहणार्‍या व गळ्यापर्यंत पोहचणार्‍या प्रवाहासारखा आहे, तो राष्ट्रांना नाशरूप चाळणीने चाळतो; भ्रांतिमूलक लगाम लोकांच्या जाभाडात आला आहे.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


एफ्राईम यहूदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील; म्हणजे अश्शूरच्या राजाला तुझ्यावर आणील.”


मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1


“परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, तो गरुडासारखा उडेल व मवाबावर आपले पंख पसरील.


समुद्र बाबेलवर लोटला आहे; त्याच्या लाटांच्या समुदायाने तो झाकून गेला आहे.


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, मोठाल्या पंखांचा, लांब पिसार्‍यांचा व चित्रविचित्र पिसांनी युक्त असा एक मोठा गरुड लबानोन पर्वतावर आला; त्याने गंधसरूची शेंड्याकडील एक डाहळी तोडून घेतली;


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला निर्जन झालेल्या नगरांप्रमाणे ओसाड नगरी करीन व तुझ्यावर खोल सागराचा लोट आणून प्रचंड जलप्रवाहांनी तुला व्यापून टाकीन,


तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील.


कारण तिच्या जखमा असाध्य आहेत; हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे, माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे.


हा पुरुष आम्हांला शांती होईल; जेव्हा अश्शूरी आमच्या देशात येऊन आमचे महाल तुडवील, तेव्हा त्याच्याविरुद्ध आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan