Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील आणि पाहा विपत्ती अंधकार व दु:खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हा ते खाली पृथ्वीकडे पाहतील आणि त्यांना फक्त संकट, अंधकार आणि भयभीत करणारी निस्तेज काळोखी दिसेल आणि त्यांना गडद अंधारात ढकलण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 8:22
25 Iomraidhean Croise  

ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटतील, त्याला जगातून पळवतील.


मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.”


तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला.


विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.


दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी : ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात.


त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.


जे तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही कोलिते वागवता ते तुम्ही सर्व आपल्याच अग्नीच्या ज्वालेत चालते व्हा! तुम्ही स्वतः पेटवलेल्या कोलितांत जाऊन पडा! माझ्या हातून हे तुम्हांला घडेल; तुम्ही क्लेशात पडून राहाल.


मी आकाशास काळा पेहराव लेववतो; गोणपाट त्याचे पांघरूण करतो.”


म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.


पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे.


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळात जबुलून प्रांत व नफताली प्रांत ह्यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळात समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील) ह्यांची तो प्रतिष्ठा करील.


ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


ह्यामुळे अंधारातल्या निसरड्या जागांप्रमाणे त्यांचा मार्ग त्यांना होईल, ते ढकलले जाऊन त्यांत पडतील; कारण मी त्यांच्यावर अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणीन, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”


ते लज्जारूपी फेस दाखवणार्‍या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan