Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 8:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील; आणि असे होईल की त्यांना भूक लागली म्हणजे ते संतापून आपल्या राजाला व आपल्या देवाला शिव्याशाप देतील; मग आपली तोंडे ते वर करतील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील. जेव्हा ते भुकेले होतील तेव्हा संतापून आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 दुःखी आणि भुकेले असे ते देशभर फिरत राहतील; जेव्हा ते भुकेने व्याकूळ होतील, तेव्हा ते रागावतील आणि वर पाहतील आणि त्यांच्या राजाला आणि त्यांच्या परमेश्वराला शाप देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 8:21
25 Iomraidhean Croise  

चवथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खायला मिळेना.


तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”


तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”


त्याची शक्ती क्षुधिताप्रमाणे क्षीण होईल; तो केव्हा पडेल ह्याची अरिष्ट वाट पाहत आहे.


तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”


तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, “तुम्ही अजून सत्त्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.”


तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.


मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते.


गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील.


तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या : उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?


म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,


मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


चौथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खाण्यास मिळेना.


तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती.


त्या दिवशी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गार्‍हाणी कराल, पण परमेश्वर त्या दिवशी तुम्हांला उत्तर देणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan