Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 8:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 8:19
28 Iomraidhean Croise  

आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.”


इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलीया तिश्बी ह्याला म्हणाला, “ऊठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदांना जाऊन गाठ आणि विचार, ‘तुम्ही एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करायला चालला आहात, ते इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय?’


त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


ह्याखेरीज हिल्कीया याजक ह्याला परमेश्वराच्या मंदिरात जो ग्रंथ सापडला होता त्यातील नियमशास्त्राची वचने स्थापित करावीत म्हणून यहूदा देशात व यरुशलेमेत दैवज्ञ व चेटकी आणि कुलदेवता, मूर्ती आदिकरून ज्या अमंगळ वस्तू योशीयाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकल्या.


शौलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानला नाही आणि परमेश्वराला प्रश्‍न करण्याऐवजी भूतविद्याप्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला,


त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले.


मिसराच्या अंगची हिंमत खचेल; त्याची मसलत मी व्यर्थ करीन; ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्‍न विचारतील.


मृत जिवंत होत नसतात, प्रेते उठत नसतात; तद्वत तू त्यांची झडती घेऊन त्यांचा विध्वंस केला आहेस व त्यांचे स्मरण अगदी नाहीसे केले आहेस.


तुला खाली पाडतील तेव्हा तू भूमीतून बोलशील; धुळीतून तुझा शब्द हळूच निघेल; जमिनीतून भुतासारखा तुझा ध्वनी उठेल; धुळीतून कुजबुजल्यासारखी तुझी वाणी निघेल.


ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरतात!


इस्राएलाचा निर्माणकर्ता पवित्र प्रभू, परमेश्वर म्हणतो, होणार्‍या गोष्टींविषयी मला कोण विचारणार? माझे पुत्र व माझ्या हातांचे कृत्य ही पाहा, असे मला कोण सांगणार?


तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके, ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस, ती आता चालव; कदाचित त्याचा तुला उपयोग होईल, त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल.


तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


तुमचे संदेष्टे, तुमचे दैवज्ञ, तुमचे स्वप्नद्रष्टे, तुमचे मांत्रिक व तुमचे जादूटोणा करणारे तुम्हांला म्हणतात की, ‘बाबेलच्या राजाची सेवा करू नका.’ त्यांचे तुम्ही ऐकू नका;


पंचाक्षर्‍यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


जो मनुष्य व्यभिचारी मतीने पंचाक्षर्‍यांच्या व चेटक्यांच्या नादी लागतो त्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन;


तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन, तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाहीत;


मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्‍न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.


आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार,


वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.


कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,


तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला उठवून आणू?” तो म्हणाला, “शमुवेलाला उठवून आण.”


शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे, तर तू मला कशाला प्रश्‍न करतोस?”


तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एखादी भूतविद्याप्रवीण स्त्री शोधा म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्‍न विचारीन.” त्याचे चाकर त्याला म्हणाले, “पाहा, एन-दोर येथे एक भूतविद्याप्रवीण स्त्री राहत आहे.”


मग शौलाने आपला वेश पालटून दुसरे कपडे घातले आणि दोन माणसे बरोबर घेऊन तो रातोरात त्या स्त्रीकडे गेला; तो तिला म्हणाला, “आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईन त्याला उठवून माझ्याकडे आण.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan