Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे, तेच आहेत ज्यांचे तुम्ही भय धरावे, तेच आहेत ज्यांना तुम्ही घाबरावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 8:13
18 Iomraidhean Croise  

अब्राहामाचा देव, नाहोराचा देव व त्यांच्या पित्याचे1 देव आपल्या दोघांचा न्याय करोत.” मग याकोबाने आपला बाप इसहाक ह्याचा जो ‘धाक’ त्याची शपथ वाहिली.


तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?


तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.


कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील तेव्हा ते माझे नाम पवित्र मानतील; याकोबाच्या पवित्र प्रभूस पवित्र मानतील व इस्राएलाच्या देवाचे भय बाळगतील.


सेनाधीश परमेश्वर तर न्यायाने उन्नत असा प्रकट होईल; पवित्र देव नीतिमत्तेने पवित्र असा प्रकट होईल.


अभ्राने देश झाकावा तसा तू माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर चाल करून येशील; हे गोगा, शेवटल्या दिवसांत असे घडेल की मी राष्ट्रांदेखत तुझ्या द्वारे आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन.


ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.


माझ्या पवित्र नावाला तुम्ही कलंक लावू नये; पण इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.


मी त्यांच्याबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता; त्याने भय धरावे म्हणून मी ती त्याला दिली होती आणि त्याला माझी भीती वाटली व माझ्या नावाचा त्याला धाक वाटला.


कारण त्सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्या वेळी त्या झर्‍याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रकट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्याविरुद्ध तुम्ही बंड केले.” (त्सीन रानातील कादेश येथील मरीबा नावाचा हा झरा.)


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.


परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला;


जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे प्रथमवत्स आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा; असे केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील;


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


त्याने एक बैलाची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासुदांच्या हाती इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवले आणि त्यांना निरोप दिला की, “जो कोणी शौल व शमुवेल ह्यांच्यामागे येणार नाही त्यांच्या बैलांची अशीच गत होईल.” तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते एकचित्ताने बाहेर निघाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan