Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 7:9
18 Iomraidhean Croise  

यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या बावन्नाव्या वर्षी पेकह बिन रमाल्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने वीस वर्षे राज्य केले.


ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”


एफ्राइमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार.


ह्यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल; त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल; कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे नियमशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे वचन अव्हेरले आहे.


परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला :


आणि त्याला सांग की, ‘सावध हो व शांत राहा; भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणार्‍या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस.


कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.”


“विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिर्‍यांचे बांधकाम करू, उंबरांची झाडे तोडून टाकली आहेत तर त्यांच्या जागी गंधसरू लावू.” असे गर्वाने व उद्दामपणाने म्हणणार्‍या सर्व लोकांना म्हणजे एफ्राइमास व शोमरोनच्या रहिवाशांना हे कळून येईल.


तेव्हा अजर्‍या1 बिन होशाया, योहानान बिन कारेह आणि सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाला म्हणाली, “तू खोटे बोलतोस; तुम्ही मिसर देशात जाऊन काही दिवस राहू नका असे कळवण्यास परमेश्वर आमचा देव ह्याने तुला पाठवले नाही;


याकोबाच्या अपराधामुळे, इस्राएल घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय?


तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले.


म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल.


बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग;


आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.


जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे; ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे; कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan