Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 7:8
12 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.


मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-जिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.


तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”


कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.”


परमेश्वर रसीनाच्या योद्ध्यांचा त्याच्यावर वरचष्मा करील, त्याच्या शत्रूंना उठवील.


“विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिर्‍यांचे बांधकाम करू, उंबरांची झाडे तोडून टाकली आहेत तर त्यांच्या जागी गंधसरू लावू.” असे गर्वाने व उद्दामपणाने म्हणणार्‍या सर्व लोकांना म्हणजे एफ्राइमास व शोमरोनच्या रहिवाशांना हे कळून येईल.


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


तुझ्या कारागिरीचा माल विपुल असल्यामुळे व सर्व प्रकारचा माल तुझ्याजवळ मुबलक असल्यामुळे दिमिष्क तुझ्याबरोबर व्यापार करत असे व तुझ्या मालाबद्दल तो तुला हेल्बोनाचा द्राक्षारस व पांढरी लोकर देई.


एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan