Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “तू आपला पुत्र शआर-याशूब (अवशेष परत येईल) ह्याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजाला भेटायला जा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 7:3
14 Iomraidhean Croise  

पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला.


एवढ्यावरही अश्शूराच्या राजाने तर्तान, रब-सारीस व रब-शाके (उच्चाधिकारी) ह्यांना मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिज्कीयाकडे पाठवले. ते यरुशलेमेला जाऊन परटाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले.


हिज्कीयाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?


त्याच्यानंतर बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी नहेम्या बिन अजबूक ह्याने डागडुजी केली; ती त्याने दाविदाच्या थडग्यासमोर, तेथे केलेल्या तळ्यापर्यंत, वीरगृह नामक ठिकाणापर्यत केली.


सकाळी फारोकडे जा; तो नदीकडे जाईल तेव्हा ज्या काठीचा साप बनला होता ती हातात घेऊन नील नदीच्या काठावर त्याच्या भेटीस उभा राहा.


अवशेष, याकोबाचा अवशेष, समर्थ देवाकडे परत येईल.


तुम्ही यरुशलेमेतील घरांची मोजदाद करून तट मजबूत करण्यासाठी घरे पाडली.


जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींच्या मध्ये हौद केला; पण ज्याने हे सर्व केले त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही; ज्याने हे पूर्वीच योजले त्याच्याकडे तुम्ही दृष्टी लावली नाही.


तेव्हा अश्शूरच्या राजाने लाखीशाहून रब-शाके1 ह्याला मोठ्या सैन्यानिशी हिज्कीया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो परटाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला.


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरी खाली जा आणि तेथे हे वचन बोल.


यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan