Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जीया ह्याच्या दिवसांत असे झाले की अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा यहूदीयाचा राजा आहाज, जो योथामचा पुत्र, जो उज्जीयाहचा पुत्र होता, अरामचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहने यरुशलेमवर हल्ला केला, परंतु त्यांच्यावर ते विजय मिळवू शकले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 7:1
15 Iomraidhean Croise  

त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने त्याच्याशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोर्‍यात त्याला व त्याच्याबरोबर अर्गोब व अरये ह्यांना वधले; पेकहाबरोबर पन्नास गिलादी लोक होते; त्यांना वधून त्याच्या जागी तो राजा झाला.


यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या बावन्नाव्या वर्षी पेकह बिन रमाल्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने वीस वर्षे राज्य केले.


त्या काळी अरामाचा राजा रसीन व रमाल्याचा पुत्र पेकह ह्यांना परमेश्वर यहूदावर चढाई करण्यास पाठवू लागला.


पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला.


मग अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेवर चढाई करून युद्धास आले; त्यांनी आहाजाला वेढा दिला पण त्यांना त्याला जिंकता आले नाही.


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


“हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात;


परमेश्वर रसीनाच्या योद्ध्यांचा त्याच्यावर वरचष्मा करील, त्याच्या शत्रूंना उठवील.


तुझे कारागिरीचे पदार्थ बहुविध असल्यामुळे अरामी लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; ते तुझ्या मालाबद्दल तुला पाचू, जांभळा रंग, तागाची वेलबुट्टीदार उत्तम वस्त्रे, प्रवाळ व माणके देत.


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया, आणि इस्राएली राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या कारकिर्दित मीखा मोरष्टी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले; शोमरोन व यरुशलेम ह्यांविषयी त्याने जे पाहिले ते हे :


Lean sinn:

Sanasan


Sanasan