Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 66:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 परमेश्वराचे वचन ऐकून कंपायमान होणार्‍यांनो, त्याचे वचन ऐका : “तुमचा द्वेष करणारे तुमचे जे बंधू माझ्या नामाचे निमित्त करून तुम्हांला हाकून देतात व म्हणतात की, ‘परमेश्वराचा गौरव होवो म्हणजे तुमचा हर्ष आम्हांला पाहण्यास मिळेल,’ ते फजीत होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका, तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे, ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो. पण ते लाजवले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेहची वचने ऐकून कंपित होणार्‍या लोकांनो, याहवेहची वचने ऐका: “तुमचे भाऊबंद जे तुमचा द्वेष करतात, आणि माझ्या नामाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तुम्हाला वाळीत टाकतात, ते थट्टेने म्हणतात, ‘याहवेहचा गौरव असो, जेणेकरून, आम्ही तुमचा हर्षोल्हास बघू!’ पण ते फजीत केले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 66:5
32 Iomraidhean Croise  

“अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”


शाफान चिटणिसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला.


तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकांसंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला, ते सगळे माझ्याजवळ जमा झाले, व मी संध्याकाळच्या अर्पणसमयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो.


तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो.


जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बर्‍याची फेड वाइटाने करणारे मला विरोध करतात.


वचन तुच्छ मानणारा स्वत:वर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणार्‍यास चांगले प्रतिफळ मिळते.


मी काळीसावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले; त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करण्यासाठी ठेवले; पण माझ्या स्वत:च्या मळ्याची राखण मी केली नाही.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


ते म्हणतात, “त्याने त्वरा करावी, आपले कार्य शीघ्र करावे म्हणजे आम्हांला ते पाहायला मिळेल; इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा संकल्प लवकर पूर्ण होवो, म्हणजे आम्हांला त्याचा अनुभव घडेल.”


तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


ती सर्व वचने ऐकल्यावर ते भयभीत होऊन एकमेकांकडे वळले व बारुखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने राजाला अवश्य सांगू.”


ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्‍चिमेकडून थरथर कापत येतील.


आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.


तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजीत झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.


ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्‍या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.


त्यांनी त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हांला शिकवतोस काय?” मग त्यांनी त्याला बाहेर घालवले.


ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा.


त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्‍यांदा दिसेल.


बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्‍चर्य मानू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan