Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 66:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्या अर्थी मी त्यांच्यासाठी दुर्दशा पसंत करीन, ज्याची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणीन; कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अशाच प्रकारे मी त्यांची शिक्षा निवडेन. ते ज्या गोष्टींना फार भितात तिच त्यांच्यावर आणीन. कारण जेव्हा मी बोलावले तेव्हा कोणी उत्तर दिले नाही. जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले आणि ज्यात मला संतोष नाही ते त्यांनी निवडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे ज्याची त्यांना धास्ती वाटते, तेच मी त्यांच्यावर पाठवेन. कारण मी जेव्हा त्यांना हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही, मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्यासमक्ष दुष्कृत्ये केली आणि मला वीट आणणार्‍या गोष्टी करणे निवडले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 66:4
24 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रांना घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले.


त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले.


मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;


दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, आणि नीतिमानाची इच्छा पूर्ण होते.


मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.


सत्याचा अगदी अभाव झाला आहे; दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतराजी झाली.


त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात; निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करतात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात.


त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”


जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्‍या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;


माझ्यासमक्ष बागांत यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे असे हे लोक आहेत.


तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”


ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.”


परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही;


कारण यहूदावंशाने माझ्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे; माझे नाम ज्या मंदिरास दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अमंगळ वस्तू त्यात ठेवल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


तुम्ही तलवारीस भिता; मी तुमच्यावर तलवार आणणार असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


ह्याकरता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो त्याला माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.


तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यांना दिले, ज्यांनी ते जगायचे नाहीत असे निर्णय त्यांना दिले.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


तरीपण लोक शमुवेलाचे म्हणणे ऐकेनात; ते म्हणाले, “नाही, नाही! आमच्यावर राजा पाहिजेच;


Lean sinn:

Sanasan


Sanasan