Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 66:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे. जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा असा आहे, जो धूप जाळतो तो मूर्तीची स्तुती करणारा असा आहे, त्यांनी स्वत: आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यांचा जीव त्याच्या अमंगळ पदार्थाच्या ठायी संतोष पावतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो, त्याने ते अर्पण नरबली देण्यासारखेच असते, जो कोणी वेदीवर कोकर्‍याचे होमार्पण करतो तो अशा व्यक्तीसारखा आहे, जो कुत्र्याची मान मोडतो; जो कोणी अन्नार्पण करतो, तो डुकराचे रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे, आणि जो कोणी स्मरणार्थ धूप जाळतो तो एखाद्या मूर्तिपूजकासारखा आहे. त्यांनी आपले मार्ग निवडले आहेत, ते त्यांच्या घृणास्पद गोष्टी करण्यामध्ये धन्यता मानतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 66:3
19 Iomraidhean Croise  

दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


कोणी हे ध्यानात आणत नाही; “त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळला, त्याच्या निखार्‍यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू?” असे म्हणण्याइतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही.


आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो; पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला.


त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”


जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्‍या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;


बागेच्या मध्यभागी असलेल्या मूर्तीच्या मागे लागावे म्हणून जे आपणांस पवित्र व शुद्ध करतात व डुकराचे मांस, अमंगळ पदार्थ व उंदीर खातात ते सगळे एकदम विलयास जातील, असे परमेश्वर म्हणतो.


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


हाग्गयाने म्हटले, “परमेश्वर म्हणतो की ह्या लोकांची व ह्या राष्ट्राची माझ्या दृष्टीने अशीच स्थिती आहे, आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे; तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे.


डुकराचा खूर दुभंगलेला आहे, पण तो रवंथ करीत नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये आणि त्यांच्या शवांना शिवू नये.


वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या3 प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.


जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.”


त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता; ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी.


लोकांनी नवे नवे देव निवडले. तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan