Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 66:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 “आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील, कारण त्यांचा किडा मरणार नाही आणि त्यांचा अग्नी कधी विझणार नाही. आणि ते मनुष्ये सर्व मनुष्यास घृणास्पद होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “ते बाहेर जातील आणि माझ्याविरुद्ध बंड केलेल्यांची प्रेते पाहतील; कारण त्यांना खाणारे किडे कधी मरणार नाही, त्यांना पेटवणारा अग्नी कधीही विझणार नाही, आणि सर्व मानवजातीला ते अमंगळ दृश्य पाहून किळस येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 66:24
24 Iomraidhean Croise  

तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील; रणभूमी प्रेतांनी भरील; चोहोकडे मस्तके फोडील.


बंडखोर व पापी ह्यांचा बरोबरच विध्वंस होईल; परमेश्वराला सोडणारे नष्ट होतील.


बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.


तुझा डामडौल, तुझ्या सारंग्यांचा नाद अधोलोकात उतरत आहे; तुझ्याखाली कृमींचे अंथरूण झाले आहे, आणि वरून तुला कीटकांचे पांघरूण झाले आहे.


भूमी मद्यप्यासारखी झोकांड्या खात आहे, माचाळासारखी झुलत आहे; तिच्या अपराधांचा भार तिला दाबत आहे; ती पडेल, आणि पुन्हा उठणार नाही.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


तो रात्रंदिवस विझणार नाही; त्याचा धूर सदा चढत राहील; पिढ्यानपिढ्या तो ओसाड पडेल; त्यात कोणी कधीही संचार करणार नाही.


त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील, त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील.


परमेश्वर म्हणतो, “दुर्जनांना शांती नसते.”


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


कारण वस्त्राप्रमाणे त्यांना कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यांना कीड खाऊन टाकील; माझा न्याय तर सर्वकाळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील.”


तुम्ही आपले नाव मागे ठेवाल त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जिवे मारील; तो आपल्या सेवकांना दुसरे नाव ठेवील;


कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल.


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालवली त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही : ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल.


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan