Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 66:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्‍या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्‍या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसर्‍या नवचंद्राच्या दिवसापर्यंत आणि एका शब्बाथ दिवसापासून दुसर्‍या शब्बाथ दिवसापर्यंत सर्व मानवजात माझ्यापुढे उपासना करण्यास येतील,” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 66:23
25 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही चिंता नाही.”


कारण राज्य परमेश्वराचे आहे; तोच राष्ट्रांचा शास्ता आहे.


तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते.


दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे. तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील.


हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील.


त्या दिवशी परमेश्वर मिसर्‍यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील.


त्या दिवशी मिसराहून अश्शूरास हमरस्ता होईल; अश्शूर मिसरात व मिसर अश्शूरात येईलजाईल; मिसर अश्शूराबरोबर उपासना करील.


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”


तर माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या उंच पर्वतावर, इस्राएलाचे सर्व घराणे, त्यातले सगळे जण आपल्या देशात माझी सेवा करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो; तेथे मी त्यांचा अंगीकार करीन; तेथे तुमच्याजवळ अर्पणे, तुमची श्रेष्ठ अर्पणे, समर्पित केलेल्या सर्व वस्तू मी मागेन.


उत्सव, चंद्रदर्शने, शब्बाथ व इस्राएल घराण्याचे सर्व सण ह्यांत होमार्पण, अन्नार्पण व पेयार्पण ह्यांची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे; इस्राएल घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणून त्याने पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावीत.


प्रभू परमेश्वर म्हणतो, आतील अंगणाचे पूर्वाभिमुख असलेले द्वार कामाचे सहा दिवस बंद असावे; शब्बाथ दिवशी ते उघडे ठेवावे; तसेच चंद्रदर्शनाच्या दिवशीही ते उघडे ठेवावे.


चंद्रदर्शनाच्या दिवशी एक निर्दोष गोर्‍हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष एडका ही अर्पण करावीत;


यहूदाही यरुशलेमेत युद्ध करील; आसपासच्या सर्व राष्ट्रांतील धन जमा होईल; सोने, रुपे व पोशाख ह्यांचा पूर लोटेल.


आणखी असे होईल की यरुशलेमेवर चढाई करून आलेल्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले सर्व, राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यासाठी व मंडपाचा सण पाळण्यासाठी प्रतिवर्षी यरुशलेमेस वर जातील.


तसेच मिसराचे घराणे वर चढून गेले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; जी राष्ट्रे मंडपांचा सण पाळण्यासाठी वर चढून जाणार नाहीत त्या सर्व राष्ट्रांवर परमेश्वर जी मरी पाठवणार ती ह्यांच्यावरही येईल.


मिसरास व मंडपांचा सण पाळण्यास वर चढून जाणार्‍या सर्व राष्ट्रांना हीच शिक्षा होईल.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे.


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan