Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 66:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मी त्यांना एक चिन्ह दाखवीन; त्याच्यातून जे वाचतील त्यांना मी तार्शीश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन; ज्यांनी माझे नाम ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबाल व यावान ह्या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन; ते अन्य राष्ट्रांत माझा महिमा प्रकट करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 66:19
48 Iomraidhean Croise  

मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,


याफेथाचे मुलगे : गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास.


शेमाचे मुलगे : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.


यावानाचे मुलगे : अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.


देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्‍यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.”


मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,


यावानाचे पुत्र : अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.


राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका.


त्या वेळेस उंच बांध्याचे व तुळतुळीत अंगाचे लोक, मुळापासून भयंकर, हुकूमत चालवणारे, पादाक्रांत करणारे, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे, त्या लोकांकडून सेनाधीश परमेश्वराचे नाम दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश परमेश्वराला नजराणे अर्पण करण्यात येतील.1


तार्शीशाची सर्व गलबते व सर्व मनोहर मनोरे ह्यांसाठी दिवस नेमला आहे.


भ्रांत मनाचे लोक सुज्ञान पावतील व कुरकुर करणारे नीतिशिक्षण घेतील.”


ते परमेश्वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत.


पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.


मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या;


द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.


हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्‍चिमेकडून येत आहेत; हे सीनी लोकांच्या देशातून येत आहेत.”


प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी राष्ट्रांना आपल्या हाताने इशारा करीन, लोकांसमोर आपला झेंडा उभारीन; ते तुझ्या पुत्रांना आपल्या उराशी धरून आणतील; तुझ्या कन्यांना खांद्यांवर बसवून पोहचत्या करतील.


माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे.


परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.


पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.


खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्यारुप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे.


बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा.


“जे मला विचारत नसत त्यांना मी दर्शन दिले; माझा धावा करत नसत त्यांना मी प्राप्त झालो. ज्यांना माझे नाम प्राप्त झालेले नव्हते त्यांना मी म्हणालो, ‘पाहा मी आहे, हा मी आहे.’


अश्वांनो, दौड करा; रथांनो, भरधाव चाला; वीरहो, पुढे चाला; ढालाईत कूश व पूट, धनुर्धारी, धनुष्य वाकवणारे लूदी तुम्ही सर्व चालू लागा.


तुझ्या सैन्यात पारसी, लूदी व पूटी हे तुझे लढवय्ये असत; ते तुझ्यात आपल्या ढाली व शिरस्त्राणे टांगत; ते तुला तेजस्वी करीत.


यावान, तुबाल व मेशेख हे तुझ्याबरोबर व्यापार करत; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला माणसे व पितळेची भांडी देत.


कूशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाती व कूबी आणि त्यांच्याबरोबर करारमदार केलेल्या देशांचे लोक त्यांच्यासह तलवारीने पडतील.


तेथे मेशेख, तुबाल व त्यांचा सर्व समूह हे आहेत; त्यांच्यासभोवती त्यांच्या कबरा आहेत; त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे म्हणून ते सर्व बेसुंती इसम तलवारीने वध पावले.


हे मानवपुत्रा, गोगाविरुद्ध संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे गोगा, रोश, मेशेख व तुबाल ह्यांच्या अधिपती, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे;


मी मागोगात व द्वीपांत निर्भय राहणार्‍या लोकांत अग्नी पाठवीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


नंतर तो आपला मोर्चा द्वीपाकडे फिरवील, व त्यांतली अनेक हस्तगत करील; पण त्याने लावलेला हा काळिमा एक सरदार नाहीसा करील; एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळिमा लावील.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


कूशाच्या नद्यांपलीकडून ते माझ्या उपासकांना आणतील, ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणतील.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;


मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.


शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे;


“त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील;” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती.


मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी;


Lean sinn:

Sanasan


Sanasan