Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 66:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणतो, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर असे म्हणतो, “आकाश माझे सिंहासन आणि पृथ्वी पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी कोठे घर बांधाल? मला विश्रांतीची जागा कुठे आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 66:1
20 Iomraidhean Croise  

देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यांत तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा?


मग दावीद राजा उभा राहून म्हणाला, “माझे बांधव व माझे प्रजाजनहो, माझे म्हणणे ऐका; परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी आणि आपल्या देवाच्या पादासनासाठी एक विश्रामभवन बांधावे असा माझा मानस असून ते बांधण्याची मी तयारी केली होती;


जे मंदिर मी बांधत आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व दैवतांहून मोठा आहे.


देव ह्या भूतलावर मानवांबरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यात तुझा समावेश होत नाही; तर हे जे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा?


परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.


“आपण त्याच्या निवासमंडपात जाऊ; त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू.”


परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे.


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्‍यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”


ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan