Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 65:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन. माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मी याकोबाचे वंशज पुढे आणेन, आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील; माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील, व तिथे माझे सेवक वसती करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 65:9
25 Iomraidhean Croise  

येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.


सीयोनेत, यरुशलेमेत, लोकांची वस्ती राहील; तू इतःपर कधी शोक करणार नाहीस; तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुझ्यावर कृपा करीलच; तो ऐकताच तो तुला पावेल.


आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.


मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही; ‘शून्य स्थळी मला शोधा,’ असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही; नीतिमत्ता सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे.


इस्राएलाचा वंश परमेश्वराच्या ठायी नीतिमान ठरेल व त्याचा अभिमान बाळगतील.”


परमेश्वर म्हणतो, “प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो.


तू धावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तींच्या समुदायाने तुला सोडवावे; त्या सगळ्यांना तर वारा उडवून नेईल, एक फुंकर त्यांना घेऊन जाईल; पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल.


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


तुम्ही आपले नाव मागे ठेवाल त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जिवे मारील; तो आपल्या सेवकांना दुसरे नाव ठेवील;


ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.


कारण मी तुम्हांला राष्ट्रांतून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन.


त्या समयी मी तुम्हांला आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन; तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”


आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.


सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan