Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 65:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता ‘त्यात लाभ आहे म्हणून ह्याचा नाश करू नका’ असे लोक म्हणतात; त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करीन; मी अवघ्यांचा नाश करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घडांत जेव्हा रस आढळतो, तेव्हा कोणी म्हणते, त्याचा नाश करू नका, कारण त्यामध्ये काही चांगले आहे.” मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेह असे म्हणतात: “कारण द्राक्षांच्या घोसात थोडाफार रस शिल्लक असतो आणि लोक म्हणतात, ‘यांचा नाश करू नका, त्यात अजूनही आशीर्वाद बाकी आहे,’ त्याप्रमाणे मी माझ्या सेवकांप्रीत्यर्थ करेन; मी त्या सर्वांचा नाश करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 65:8
14 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.”


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


अवशेष, याकोबाचा अवशेष, समर्थ देवाकडे परत येईल.


कारण हे इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या रेतीइतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परत येईल; न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमला आहे.


माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले.


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो; कारण ज्या राष्ट्रांतून मी तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन, पण तुझा पूर्ण नाश करणार नाही; तरी मी तुला योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.


परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.


आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.


आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan