Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 65:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 “पाहा, हे माझ्या समोर लिहीले आहे, मी गप्प बसणार नाही, पण त्यांना परत फेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6-7 “पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 65:6
22 Iomraidhean Croise  

मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते.


त्याच्या वाडवडिलांच्या अनीतीचे परमेश्वराला स्मरण राहो; त्याच्या आईचे पातक काढून टाकले न जावो.


असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत; माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?


हे प्रभू, आमच्या शेजार्‍यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.


आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की, “ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल; कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून5 अजिबात पुसून टाकीन.”


कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.


दुष्ट हायहाय करणार; त्याचे वाईट होणार; कारण त्याने आपल्या हातांनी जे केले त्याचे फळ त्याला मिळेल.


मी दीर्घकाळ मौन धरले; मी स्तब्ध राहिलो; मी स्वतःला आवरले; वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे मी आता कण्हत आहे, उसासे व धापा टाकत आहे.


ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्‍यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.


हे परमेश्वरा, हे पाहून तू आपल्याला आवरशील काय? तू स्तब्ध राहून आम्हांला अशा दुर्धर पीडेत राहू देशील काय?


नगरातून कोलाहल ऐकू येतो; मंदिरातून शब्द ऐकू येतो; आपल्या शत्रूंचे पारिपत्य करणार्‍या परमेश्वराचा शब्द ऐकू येतो;


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


तरी ज्यांचे मन त्यांच्या तिरस्करणीय व अमंगळ वस्तूंच्या मनोरथास अनुसरते त्याच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी येईलसे मी करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”


सोर, सीदोन व पलेशेथाचे सर्व प्रदेशहो, तुम्ही माझे काय करणार? मी केलेल्याचा बदला घेता काय? अथवा मला काही करता काय? मी त्वरेने तुमचे कृत्य तुमच्या माथी मारीन.


तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.


द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”


‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय?


मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan