Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 64:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तू अनपेक्षित भयप्रद कृत्ये करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षीत नव्हत्या, तेव्हा तू खाली उतरून आलास, पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 64:3
16 Iomraidhean Croise  

तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता?


हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती.


देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.


अहो या, देवाची कृत्ये पाहा; तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो.


तेव्हा भूमी कंपित झाली, व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली; देवासमोर, इस्राएलाच्या देवासमोर, सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.


अधिपतींची हिंमत तो नष्ट करतो; पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे.


परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी एक करार करतो; तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


अहाहा! तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!


देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे.


तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.


तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे, आणि ही जी महान व भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत.


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan