Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 64:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आमचे पूर्वज ज्या आमच्या पवित्र व सुशोभित मंदिरात तुला स्तवीत, ते अग्नीचे भक्ष्य झाले आहे, आणि आमच्या सगळ्या मनोरम वस्तू नष्ट झाल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आमचे पवित्र आणि सुंदर मंदिर, जेथे आमचे पूर्वज तुझी उपासना करत असत, त्यास अग्नीने नष्ट करण्यात आले आहे. आणि आम्हास प्रिय असलेल्या सर्व गोष्टींचा नाश झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली, ते आमचे पवित्र व वैभवी मंदिर बेचिराख झाले आहे, आणि आम्ही जोपासलेल्या सर्व वस्तूंची राखरांगोळी झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 64:11
21 Iomraidhean Croise  

मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली.


“ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्राएल लोकांना विसावा दिला तो धन्य! तो आपला सेवक मोशे ह्याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही.


त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


खास्दी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तेथील वाडे आग लावून जाळले व त्यांतल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.


तो म्हणाला, “धन्य तो इस्राएलाचा देव परमेश्वर, त्याने स्वमुखाने माझा बाप दावीद ह्याला वचन दिले होते व त्याने आपल्या हातांनी ते पूर्ण केले, ते वचन असे :


अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले तेव्हा सर्व इस्राएल लोक ते पाहत राहिले; जमिनीवरच्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लववून नमन केले आणि “परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे” असे म्हणून त्यांनी त्याचे उपकारस्मरण केले.


याजक आपापल्या स्थानी उभे राहिले; परमेश्वराची दया सनातन आहे असे लेव्यांच्या द्वारे परमेश्वराचे उपकारस्मरण करण्यासाठी जी वाद्ये दावीद राजाने परमेश्वराप्रीत्यर्थ केली होती ती घेऊन लेवीही उभे राहिले; त्यांच्यापुढे याजक कर्णे वाजवू लागले आणि सर्व इस्राएल लोक उभे राहिले.


तुझ्या पवित्र लोकांनी केवळ थोडा काळ वतन भोगले; आमच्या शत्रूंनी तुझे पवित्रस्थान तुडवून टाकले आहे.


त्याने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्‍याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.


हायहाय! प्रभू सीयोनकन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टत आहे! त्याने इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे; त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही.


परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे, त्याला आपल्या पवित्रस्थानाचा वीट आला आहे; त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत; पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे.


‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.


“हे मानवपुत्रा, त्यांचे बळ, त्यांचा वैभवमूलक हर्ष, त्यांच्या नेत्रांना प्रिय वाटणार्‍या वस्तू, त्यांच्या जिवाचा इष्टविषय आणि त्यांचे कन्यापुत्र मी त्यांच्यापासून हरण करीन;


तेव्हा परमेश्वराचा दिव्यदूत म्हणाला, ‘हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज सत्तर वर्षे यरुशलेम व यहूदाची नगरे ह्यांवर कोपायमान झाला आहेस; त्यांच्यावर तू कोठवर करुणा करणार नाहीस?’


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्‍यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”


आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan